वार्वेतर्फे नातूनजीकची घटना, ४ तास वाहतूक ठप्प
प्रतिनिधी / खेड
कोकण मार्गावरील वार्वेतर्फे नातूनजीक देखभाल दुरूस्ती (युटीव्ही) गाडीची पुढील २ चाके रूळावरून निखळल्याची घटना रविवारी सकाळी ६.५० वाजण्याच्या सुमारास घडली. कोकण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नेत्रावती व मंगला एक्सप्रेसला रत्नागिरीत तर मांडवी एक्सप्रेस रोहा स्थानकात थांबवण्यात आली आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही विस्कळीत झाले आहे. दोन क्रेन घटनास्थळी दाखल झाल्या असून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. रूळावरील जॉईंट सुटल्यामुळे अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.