ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिका आणि भारत यांच्यात रणनीतीच्या दृष्टीने संबंध अधिक मजबूत केल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लीजन ऑफ मेरिट’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंह सिंधू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे हा पुरस्कार स्वीकारला. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी हा पुरस्कार दिला. ओब्रायन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसोबत रणनितीबाबतच्या संबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘लीजन ऑफ मेरिट’ पुरस्कार दिला आहे.