नवी दिल्ली : इंग्लंडमधील केर्न एनर्जी पीएलसीने भारत सरकारविरुद्धचा करासंदर्भात दाखल केलेला लवाद जिंकला आहे. भारताला 10 हजार 247 कोटींची रक्कम भरण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत.
भारत सरकारअंतर्गत तीन सदस्यीय न्यायालयाने यासंबंधी 2006-07 सालात 10 हजार 247 कोटी रुपये कर भरण्याची भारतातील केर्नच्या व्यवसायाबाबतची मागणी योग्य नसल्याची भूमिका आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडली होती. पण ही बाब आंतरराष्ट्रीय न्यायालयाने खोडून काढली आहे. निकाल देताना, कंपनीच्या विक्री झालेल्या समभागांचे मूल्य तसेच लाभांश व कर परताव्यासंबंधीची रक्कम परत करण्याचे आदेश भारत सरकारला दिले आहेत. केर्न एनर्जीला झालेली नुकसानभरपाई देण्याची मागणी भारत सरकारकडे करण्यात आली आहे. कर व इतर व्याजाच्या खर्चासह भारत सरकारला 10 हजार 247 कोटी रुपये भरण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी सरकार आता अभ्यास करणार असून पुढची रणनिती लवकरच ठरवली जाणार आहे.