सातारा
सातारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए सातारा जिह्यातील आंबेडकरी प्रेमीसाठी सातारा जिल्हा शाखेच्यावतीने माझा समाज, माझी जबाबदारी, या वर्षी अभिवादन घरच्या घरी, या उक्तीप्रमाणे पुणे भीमा कोरेगाव येथे होणारी गर्दी टाळण्यासाठी व कोविड हद्दपार करण्यासाठी भीमा कोरेगाव येथे न जाता सर्व आंबेडकरी अनुयायांनी रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हाध्यक्ष यांच्या संकल्पनेतून आंबेडकरी अनुयांयाना विजयस्तंभाची प्रतिकृती अभिवादनासाठी ठेवून दि.1 जानेवारी अभिवादन शौर्य दिनाचे पूर्वजांना सातार मधूनच करावे, असे आवाहन रिपाइचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी केले आहे.
भिमा कोरेगाव विजय स्तंभाची दहा फूट उंचीची प्रतिकृती उभारून शाहू चौकातील महामानवाच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात येणार आहे. आंबेडकरी अनुयायांनी 6 डिसेंबर रोजी शासनास सहकार्य करून मुंबईतील गर्दी टाळली. त्याच प्रमाणे भीमा कोरेगाव येथील गर्दी टाळून कोवीडला हद्दपार करण्यास शासनाला प्रतिसाद द्यायचा आहे. सातारमध्ये अभिवादनाच्या वेळी सोशल डिस्टन्स, मास्क, सँनीटाझर याचा वापर करण्यात येणार आहे. सर्वांनी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे न जाता साताऱयात अभिवादन करावे. माझा समाज, माझी जबाबदारी, या उपक्रमातंर्गत अभिवादनास येताना मास्क हे जरूरीने आणावे, प्रतिकृती करण्यासाठी श्री समर्थ इंटरप्राईजेस विकास नगर सातारा व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्ल्यू फोर्स जिल्हाअध्यक्ष किरण ओव्हाळ, युवक उपाध्यक्ष सोमनाथ धोत्रे, दीपक नलावडे, जयवंत कांबळे, माणिक आव्हाड, दीपक गाडे, शेखर आडागळे, किशोर डेंगळे, यशवंत ओव्हाळ, वैभव शिंदे, प्रतीक गंगावणे, विनोद देखणे, बाबा ओव्हाळ, सुनिल ओहाळ, राजू आव्हाळ इत्यादी परिश्रम घेत आहेत.