1975 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य
वृत्तसंस्था/ राऊरकेला
1975 मधील विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकणाऱया व 1972 ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकलेल्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य मायकेल किंडो यांचे गुरुवारी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.
वयोमानानुसार निर्माण झालेल्या तब्बेतीच्या तक्रारीनंतर त्यांना इस्पात जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बऱयाच दिवसांपासून ते अंथरूणाला खिळले होते. याशिवाय त्यांना डिप्रेशनचीही समस्या होती,’ असे त्यांच्या कुटुंबियातील सूत्रांनी सांगितले. त्यांच्या मुलींचे आगमन झाल्यानंतर शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हॉकी इंडियानेही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. किंडो हे फुलबॅक म्हणून खेळत असत. भारताने विश्वचषक स्पर्धा 1975 मध्ये फक्त एकदाच जिंकली होती. त्या संघाचे ते सदस्य होते. याशिवाय 1972 मधील म्युनिच ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्यपदक मिळविले होते. त्या संघातही त्यांचा सहभाग होता. या स्पर्धेत त्यांनी तीन गोल नोंदवले होते