प्रतिनिधी / मिरज
गीता जयंती निमित्त आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ मिरज शाखेच्या वतीने ५०० ग्रंथांचे वाटप करण्यात आले. लोकनाथ स्वामी महाराज आणि इस्कॉन आरवडे यांनी यासाठी मदत केली. कोरोना काळात निराशग्रस्त बनलेल्या नागरिकांना सदरचे ग्रंथ जगण्याची नवी दिशा देईल, असा विश्वास ईस्कॉनच्या सदस्यांनी व्यक्त केला.
कोरोना काळात अनेकांचे हाल झाले. रोजच्या जीवनातील प्रश्न सोडविणे लोकांना कठीण झालेले आहे. त्यामुळे काही लोक निराशेने ग्रासलेले असून, आत्महत्यासारखे टोकाचे पावले उचलत आहेत. या परिस्थितीत हरे कृष्णा संघ इस्कॉनच्या मिरज शाखेतर्फे ५०० ग्रंथ विनामूल्य वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गीता वाटप करुन नागरिकांना गीताआध्यायांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.