मनपाच्या अतिक्रमण पथकाची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
शहर आणि बाजारपेठेतील रस्त्यावर ठाण मांडलेल्या भटक्मया जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. याबाबत तक्रारी वाढल्याने जनावरे पकडण्याची मोहीम महापालिकेने पुन्हा एकदा सुरू केली आहे. मंगळवारी दिवसभरात शहरातील विविध भागातील केवळ 3 जनावरे पकडण्याची कारवाई करण्यात आली. पकडण्यात आलेली जनावरे गो-शाळेत दाखल करण्यात आली. गो-शाळेत जनावरे घेण्यास नकार देण्यात आल्याने भटकी जनावरे पकडण्याची मोहीम बंद ठेवण्यात आली होती. पण आता महापालिकेची गो-शाळा सुरू झाली आहे. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन पथकाने दोन वाहनांसह शहरातील विविध भागात भटकी जनावरे पकडण्याची मोहीम राबविली. मुख्य बाजारपेठेसह खडेबाजार परिसर, संयुक्त महाराष्ट्र चौकासह नुरगुंदकर भावे चौक, धर्मवीर संभाजी चौक अशा विविध ठिकाणी भटकी जनावरे ठाण मांडत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना आणि बाजारपेठेत येणाऱया नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आल्याने मंगळवारी महापालिकेने भटकी जनावरे पकडण्याची मोहीम पुन्हा हाती घेतली. शहरात ठिकठिकाणी जनावरांचे कळप ठाण मांडत आहेत. महापालिकेच्यावतीने नरगुंदकर भावे चौक परिसरात तीन जनावरे ताब्यात घेऊन त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली