प्रतिनिधी / सांगली
मातंग समाजातील विविध प्रश्नांवरती बैठक घेऊन सर्व प्रलंबित विषय मार्गी लावु असे आश्वासन डॉ. विश्वजीत कदम यांनी दिले होते. त्यामुळे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी समितीच्या वतीने त्यांच्या सत्कार साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची प्रतिमा भेट देऊन करण्यात आला.
यावेळी आकाश तिवडे, विजय आवळे, लिना यादव, संध्याताई आवळे, नवनाथ माने, आदर्श मोरे, अक्षय कांबळे, शुभम बनसोडे, गॉब्रीएल तिवडे, राजू चव्हाण, शुभम लोखंडे, लखन मोरे, अतिश तांदळे यांच्यासह बहुसंख्येने मातंग समाज बांधव उपस्थित होते. नियोजन विजय आवळे यांनी केले. विशेष सहकार्य मयुर पाटिल, अभिजीत भोसले व मंगेश चव्हाण यांचे लाभले.