दिल्ली/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राध्यापिका चित्रा घोष यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. एका ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राध्यापिका चित्रा घोष यांनी शैक्षणिक आणि समाज सेवेसाठी मोठे योगदान दिले. नेताजी बोस यांच्याशी संबंधित फायली खुल्या करण्यासह विविध विषयांवर चर्चा केली तेव्हा त्यांच्याशी मी साधलेला संवाद मला आजही आठवतो. त्यांच्या निधनाने दु: ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना. ओम शांती. असे पंतप्रधानांनी म्हंटले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भाची चित्रा घोष यांचे निधन, पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला. चित्रा घोष या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भाची होती.