प्रतिनिधी / शिराळा
शिराळा येथे सोमवार पेठेत सम – विषम पद्धतीने पार्कींग करण्यासाठी सूचना फलक लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा त्याचे नागरिकांकडून पालन केले जात नाही. यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. शिराळा ग्रामपंचायत चे २०१६ ला नगरपंचायतीत रूपांतर झाले. वाढती लोकसंख्या आणि उद्योगामुळे शिराळा शहराचा विस्तार होत गेला. त्या तूलनेत नागरी सुविधा उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे.
शिराळा शहरात सोमवार पेठ ही मुख्य बाजारपेठ आहे. संपूर्ण शिराळा तालुका आणि आसपासच्या भागातून लोक इथे येत असतात. त्यामुळे गर्दी होणे स्वाभाविक आहे. पार्कींगसाठी सोमवार पेठेत स्वतंत्र व्यवस्था नाही. शिवाय सम-विषम पद्धतीचे पालन होत नसल्याने वाहतूक कोंडीला नेहमीच सामोरे जावे लागते. रस्त्याच्या दुतर्फा जशी जागा मिळेल, त्या प्रमाणे वाहने उभी केली जातात. यामुळे सोमवार पेठेत नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे.
सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे. ऊस तोडणी मजूर वाहन रात्री आल्यानंतर ऊस वाहन भरण्यासाठी शेतात जातात. तसेच भारनियमनामुळे आठवड्यातील काही दिवस शेतातील विजपुरवठा रात्री सुरू असतो.पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात असतात.