जिल्हाधिकाऱयांना निवेदन, नियमांचे पालन करण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
औषध दुकानांना परवाना देताना नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे सध्या असलेल्या औषध दुकानदारांना मोठा फटका बसत आहे. कार्पोरेट कंपन्यांनी किरकोळ औषध विक्री करण्यासाठी घातलेल्या औषध दुकानांमुळे सर्वसामान्य औषध विपेत्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. तेंव्हा याबाबत योग्य ती नियमावली करुन सर्वच औषध दुकानदारांना व्यवसाय करण्यास सहकार्य करा, अशी मागणी बेळगाव जिल्हा रिटेल फार्मसी असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये आपोलो, वेल्नेस, मेडपल्स सारख्या कार्पोरेट कंपन्यांची दुकाने झाल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. 15 ते 20 टक्के सवलत दिली जात आहे. त्यामुळे किरकोळ विक्री करणाऱयां औषध दुकानदारांवर मोठे संकट कोसळले आहे. मुळातच 16 ते 18 टक्के फायदा आहे. त्यामध्ये अशा प्रकारे जर सवलत दिली तर इतरांनी व्यवसाय कसा करायचा? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
आम्हाला आता दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे. तेंव्हा कार्पोरेट कंपन्यांवर निर्बंध घालावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. पंजाबमध्ये औषध दुकान असलेल्या 500 मीटर परिसरात दुसऱया दुकानाला परवानगी देण्यास बंदी आहे. मात्र कर्नाटक मध्ये हा नियम लागू करण्यात आला नाही. त्यामुळे या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. तेंव्हा योग्य प्रकारे पाऊल उचलून सहकार्य करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. महसुल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष जयवंत साळुंखे, सेपेटरी बंडू सदलगे, खजिनदार नितीन जानवर, विक्रांत शानभाग, पवन देसाई, भरत कुपनट्टी, सिध्दन्ना मुनवळ्ळी, विनोद कोळीवाड, शैलेंद्र जैन, महेश अनगोळकर यांच्यासह दुकानदार उपस्थित होते.