वृत्तसंस्था/ पॅरीस
डब्ल्यूटीए टूरवरील सोमवारी घोषित करण्यात आलेल्या महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत बेलारूसच्या ऍरिना साबालेन्काने सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. अलिकडच्या कालावधीत साबालेन्काने सलग तीन स्पर्धा जिंकल्या आहेत. या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने आपले अग्रस्थान कायम राखले आहे.
बेलारूसच्या साबालेन्काने अबु धाबीमध्ये झालेल्या टेनिस स्पर्धेत कुड्रेमेटोव्हाचा 6-2, 6-2 असा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. त्यानंतर साबालेन्काने ओस्टेव्हा आणि लिंझ येथील स्पर्धा जिंकल्या होत्या.
महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची बार्टी 87ख17 गुणांसह पहिल्या. रूमानियाची हॅलेप 7255 गुणांसह दुसऱया, जपानची ओसाका 5780 गुणांसह तिसऱया, अमेरिकेची केनिन 5760 गुणांसह चौथ्या, युक्रेनची स्विटोलिना 5260 गुणांसह पाचव्या, झेकची प्लिसकोव्हा 5205 गुणांसह सहाव्या, बेलारूसची साबालेन्का 4580 गुणांसह सातव्या, कॅनडाची अँड्रेस्क्यु 4555 गुणांसह आठव्या, झेकची क्विटोव्हा 4516 गुणांसह नवव्या आणि हॉलंडची बर्टन्स 4505 गुणांसह दहाव्या स्थानावर आहेत.