ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीच्या खान मार्केट परिसरात शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास सहा जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये तीन युवक आणि तीन युवतींचा समावेश आहे.
खान मार्केट मेट्रो स्टेशनजवळ ताब्यात घेण्यात आलेले सहा जण बाईकवर बसून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत होते. बाईक भाड्याने घेऊन ती वेगात बाईक चालविण्याची आम्ही शर्यत लावली होती. त्यावेळी आम्ही परस्परांचा वेगवेगळया देशांच्या नावांवरुन पुकार करत होतो, असे स्पष्टीकरण या सहा जणांनी पोलिसांना दिले आहे.
मात्र, पोलिसांनी या सहा जणांच्या कुटुंबियांचीही चौकशी सुरू केली आहे