बेंगळूर/प्रतिनिधी
जेडीएसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री एम. सी. मानगुळी यांचे बेंगळूर येथील खासगी रुग्णालयात वयाशी संबंधित आजारांमुळे निधन झाले, अशी माहिती गुरुवारी सूत्रांनी दिली. ८५ वर्षांचे मानगुळी श्वासोच्छवासाच्या समस्यांमुळे त्रस्त होते. बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले.
ते १९९४ आणि २०१८ मध्ये सिंदगी येथून निवडून आले होते. दरम्यान एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस-जद (एस) आघाडी सरकारमध्ये दोनदा मंत्री म्हणून काम पाहिले आहे. मानगुळी यांचे पार्थिव सिंदगी येथे हलविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मानगुळी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि म्हटले आहे की त्यांच्या निधनाने राज्यात एक वरिष्ठ नेता गमावला आहे. मानगुळी हे त्यांचे दीर्घकाळ राजकीय आणि वैयक्तिक सहकारी असल्याचे लक्षात घेऊन जेडीएसचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी मानगुळी यांच्या जाण्याने त्यांना खूप वेदना होत आहेत, असे ते म्हणले.