उपाध्यक्षपदी प्रेमा नरोटी यांची निवड
कडोली : कडोली ग्राम पंचायतीच्या झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत ग्राम विकास आघाडीच्या श्रीदेवी वैजनाथ पाटील यांची अध्यक्षपदी तर प्रेमा रायाप्पा नरोटी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
मंगळवारी सकाळी मतदानानुसार झालेल्या निवडणुकीत श्रीदेवी वैजनाथ पाटील यांना 18 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार मंजुळा निंगाप्पा अंबी यांना 9 मते मिळाली तर उपाध्यक्ष निवडणुकीत प्रेमा रायाप्पा नरोटी यांना 16 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी वैशाली कल्लाप्पा बिजगत्ती यांना 11 मते मिळाली.
येथील ग्राम पंचायत सदस्यांची संख्या 27 असून, यापैकी काँग्रेसने 11 जागा, भाजपने 10 जागा तर 6 जागा अपक्षाला मिळाल्या होत्या. अपक्षांना हाताशी धरून सत्ता पुन्हा आपल्याकडे ठेवण्यात काँग्रेस पुरस्कृत ग्राम विकास आघाडीला यश मिळाले आहे. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून एस. आर. हंप्पीहोळी यांनी काम पाहिले.