प्रतिनिधी/ गोडोली
खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपन हाफ पिच टेनिस बॉल स्पर्धा 20 ते 24 फेब्रुवारी रोजी गोळीबार मैदान येथे आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राजहंस युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राहूल पाटोळे यांनी दिली.
राजहंस फाऊंडेशन सातत्याने सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रिडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात आघाडीवर आहे. खासदार उदयनराजे भोसले यांना दैवत मानणारे या फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते आहेत. त्यांनी यावर्षी खासदारांच्या वाढदिवसानिमित्त गोडोलीतील गोळीबार मैदानावर खासदार उदयनराजे चषक हि भव्य ओपन हाफ पिच टेनिस बाँल स्पर्धा 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केली आहे. या स्पर्धेच्या विजेत्या संघाला प्रथम क्रमांक 30 हजार 1 रुपयांचे आणि चषक, द्वितीय क्रमांक 20 हजार 1 रुपये आणि चषक, तिसऱया क्रमांकासाठी 10 हजार 1 रुपये आणि चषक असे बक्षिसे मिळणार आहेत.
स्पर्धेची नाव नोंदणी करण्यासाठी अतुल पाटोळे 9700727007, आदित्य शेंडे 8010509099, अर्जुन बडेकर 9765213434 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.