तीन तलवारी जप्त, स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई
प्रतिनिधी / मिरज
शहरातील ईदगाह माळ येथे बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी संतोष आनंदा पाटील (वय ३७) याला अटक केली आहे. त्याच्याकडून तीन तलवारी जप्त करण्यात आल्या. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने ही कारवाई केली.
ईदगाह माळ येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना ईदगाह माळावरील शंभर फुटी रोडवर कारंजाजवळ संतोष पाटील हा तलवारी घेऊन थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले असता त्याच्या जवळ एका पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशवीत तीन तलवारी मिळून आल्या. पालिसांनी सदर तलवारी जप्त केल्या असून, संतोष पाटील याला अटक केली आहे.