ऑनलाईन टीम / नांदेड :
खलिस्तान जिंदाबाद संघटनेचा सदस्य असलेला सरबजीतसिंग किरट याला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पंजाबच्या गुन्हे अन्वेषण पथकाने रविवारी उशिरा अटक केली. आज सकाळी एका वृत्तसंस्थेने ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली.
सरबजीतसिंग किरट हा बेल्जियमशी संबंधित खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता. बेल्जियममधून त्याला दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवले जात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. 7 फेब्रुवारीला त्याला अटक करण्यात आले असून, त्याला पंजाबला नेण्यात येत आहे.