ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेश बोर्डाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रदेशाचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी सांगितले की, हायस्कूल आणि इंटरमिडीएटची परीक्षा 24 एप्रिल पासून सुरू होणार आहे.
पुढे ते म्हणाले, यावर्षी 10 वी च्या परीक्षेसाठी 29 लाख 94 हजार 312 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यामध्ये 16,74,022 विद्यार्थी आणि 13,20,290 विद्यार्थिनी आहेत. तर बारावीसाठी यंदा 26 लाख 9 हजार 501 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यामध्ये 14,73,771 विद्यार्थी आणि 11,35,730 विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत.
24 एप्रिल पासून सुरू होत असलेली दहावीची परीक्षा 10 मे रोजी तर 12 वी ची परीक्षा 12 मे रोजी संपणार आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.