बेळगाव : जीएसएसच्या बीसीए विभागातर्फे नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून कार्यकारी मंडळाच्या उपाध्यक्षा बिंबा नाडकर्णी उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. एन. डी. हेगडे होते. बीसीएचे संचालक प्रा. प्रसाद खोडे यांनी स्वागत केले. तसेच अभ्यासक्रमाची व नियमांची माहिती दिली.
प्लेन क्रॅश या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मैत्रेयी सुभेदार व अमोल ड्रगो यांनी काम पाहिले. अन्य स्पर्धांचे परीक्षक म्हणून प्राध्यापकांनी काम पाहिले.
यानंतर खेळ, प्रश्नमंजुषा, प्लेन
क्रॅश, संभाषण कौशल्य स्पर्धा झाल्या. प्रा. प्रसाद खोडे यांनी बक्षीस वितरण केले.