खंजर गल्ली येथील मटक्मयाचे शेड नागरिकांनी पाडले, राजू कडोलकर, बाळू तोपिनकट्टी यांच्या घरांवर छापे
प्रतिनिधी / बेळगाव
मटकाबुकींविरूद्ध बेळगाव पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. न्यायालयाची परवानगी घेवून दोघा मटकाबुकींच्या घरांवर गुरुवारी सकाळी छापे टाकण्यात आले असून तीन ठिकाणी शोध मोहीम राबविण्यात आली. तर खंजर गल्ली, लाकूड अड्डा परिसरातील मटक्मयाचे शेड स्थानिक नागरिकांनी पाडले आहे.
कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी गुरुवारी ही माहिती दिली आहे. मटका, जुगारी अड्डय़ांवरील कारवाई पोलिसांनी तीव्र केली आहे. कामत गल्ली व कांगली गल्ली येथील दोघा प्रमुख बुकींच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहेत. कामत गल्ली येथील राजू मारुती कडोलकर याच्या घरात मार्केट पोलिसांनी शोध मोहीम राबविली आहे. तर मारिहाळ पोलिसांनी बाळू तोपिनकट्टी या मटका बुकीच्या कांगली गल्ली व हनुमाननगर येथील घरांवर छापे टाकून तपास करण्यात आला. मात्र या कारवाईत नेमके काय सापडले? याचा उलगडा झाला नाही.
मार्केट व मारिहाळ पोलिसांत मटकाप्रकरणी दाखल झालेल्या गुन्हय़ांच्या तपासासाठी न्यायालयाची परवानगी घेवून पोलिसांनी शोध मोहीम राबविली. गुरुवारी दुपारपर्यंत ही मोहीम सुरू होती. मात्र या कारवाईच्यावेळी दोन्ही प्रमुख बुकी फरारी झाल्याचे समजते.
दरम्यान खंजर गल्ली, लाकूड अड्डा परिसरातील शेड नागरिकांनी पाडले आहे. याच शेडमध्ये मटका चालत होता. वारंवार पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नागरिकांनी ते शेड हटविल्याचेही पोलीस उपायुक्तांनी सांगितले. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी मटका, जुगाऱयांविरूद्ध सुरू केलेल्या कारवाईमुळे जुगारी व मटकाबुकींचे धाबे दणाणले आहेत.