वार्ताहर / गोकुळ शिरगाव
पुणे बेंगलोर महामार्गावर कणेरीवाडी हद्दीतील रेणुका लोकनाट्य गृहासमोर दुपारी तीनच्या सुमारास ट्रक क्रमांक (एम एच 14 सी पी 17 78 या ट्रकला किन्नर साईटला आग लागून ट्रकमधील प्लास्टिक पायलेट, पी बॉक्स, लोखंडी स्कीड, ट्रक यासह सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, ट्रक व साहित्य जळून खाक झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या बाबतची फिर्याद रघुनाथ अण्णाप्पा माळी (रा.आप्पाचीवाडी ता.चिकोडी जि बेळगाव )यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार तळेवाडीकर व उदय कांबळे हे करीत आहेत.