प्रतिनिधी / जोतिबा डोंगर
महाराष्ट्रसह,कर्नाटक,आंध्र,गोवा,गुजरात व अन्य राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रधास्थान असलेला दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची खेट्याची यात्रा खासकरुन कोल्हापुरकरांची खेट्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली ही यात्रा या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने, पुजारी, ग्रामस्थ, देवस्थानसमिती मानकरी यांच्या उपस्थितीत धार्मिक रितीरिवाजाने पार पडली. अनेक मार्गावर पोलीस बंदोबस्त, सर्वत्र शुकशुकाट, दुकानदार,व्यावसायिक यांच्यात नाराजी दिसत होती. तर खेट्यानिमीत्त ‘श्री’ चे दर्शन झाले नाही त्यामुळे भाविकांत नाराजी दिसत होती.
गेल्या वर्षी पाचव्या खेट्याला कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मंदीर प्रशासनाच्या आदेशानुसार पाचवा खेटा रद्द करण्यात आला. त्यानंतर आठ महीने मंदिर पूर्णतः भाविकांसाठी मंदिर बंद होते. दिवाळीच्या पाडव्यादिवशी भाविकांसाठी मंदिर मुख्य मंत्र्यांच्या आदेशानुसार सुरु करन्यात आले, तेव्हा पासुन ते कालच्या पौर्णिमेपर्यंत भाविकांची तूफान गर्दी‘श्री,चे दर्शन घेन्यासाठी झाली होती. या कालावधित कोरोनाची लागण झालेली एकही घटना जोतिबा डोंगरावर घडल्याची बातमी न्हवती.
परंपरेनूसार खेट्याच्या यात्रेला कोल्हापूर सह महाराष्ट्र,कर्नाटक व अन्य राज्यातील लाखों भाविक खेट्यानीमित श्रीं चे दर्शन घेन्यासाठी येत असतात डोंगरावर प्रचंड गर्दी होणार त्यामूळे जिल्हाअधिकारी यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर खेट्याची चार रविवार भरणारी यात्रा रद्द करण्याचे आदेश दिले. त्यामूळे खेट्याची यात्रा भरली नाही.तरी देखील असंख्य भावीक गिरोली,वाघबीळ,पांजरपोळ,क़ेर्ली,केर्ले,व अन्य मार्गावर बंदोबस्थ असल्या मूळे श्री चे दर्शन न घेताच नाराज़ होऊन परतत होते.
त्यामूळे यंदा पहील्या खेट्याला ना चांगभलचा गजर,ना गुलाल खोबऱ्याची ऊधळण,ना भाविकांची मंदीर परीसरात मांदीयाळी,सर्वत्र शुकशूकाट व शांतता अशा वातावरनात पहीला खेटा संपन्न झाला. दरम्यान रविवार सोडुन सोमवार ते शनिवार भाविकांना सोशल डिस्टंशन पाळून ‘श्री’ चे दर्शन घेन्यासाठी पुर्वी प्रमाणे मंदिर खुले राहणार आहे.