आईवर भार पडू न देण्याचा प्रयत्न, 7 वर्षीय मुलीला मेंदूशी संबंधित आजार
एक 7 वर्षीय मुलगी स्वतःच्या मेंदूवरील शस्त्रक्रिया करविण्यासाठी लिंबू-पाणी विकत आहे. स्वतःच्या आईच्या बेकरीतच ती लिंबू-पाणी विकत आहे. या मुलीचे नाव लीजा स्कॉट असून ती अमेरिकेच्या अलबामा येथे राहते. तेथे तिची आई एलिझाबेथ यांची बेकरी आहे. यात लीजाही कामात हातभार लावत आहे.
सॅवेज बेकरीत लीजा लिंबू-पाण्याचा स्टॉल लावते. जितके अधिक लोक लेमनेड पित आहेत, तितकीच ती तिच्या लक्ष्यासमीप पोहोचत आहे. स्वतःच्या शस्त्रक्रियेसाठी लीजा पैसे जमवत आहे, जेणेकरून तिच्या आईवरील आर्थिक भार कमी होईल. लीझाच्या मेंदूत तीन ठिकाणी अडथळे (वैद्यकीय भाषेत सेलेब्रल मॅलफॉर्मेशन) निर्माण झाले असून यामुळे मेंदूच्या उजव्या भागात समस्या निर्माण झाली आहे. तसेच तिला सातत्याने चक्क येत असल्याचे एलिझाबेथ यांनी सांगितले आहे.
शुद्धच हरपली होती.
सुमारे महिन्यापूर्वी लीजाला चक्कर आली आणि तिचे स्नायू घट्ट होऊ लागले होते. वैद्यकीय परीक्षणात सेरेबल मॅलफॉर्मेशनमध्ये डॉक्टरांना सर्वसाधारणपणे एकाच प्रकारे मॅलफॉर्मेशन दिसून येते, पण लीझाच्या प्रकरणात त्यांना तीन ठिकाणी मॅलफॉर्मेशन दिसून आले आहे.
प्रार्थना करत राहते
लीजावरील पहिली शस्त्रक्रिया बॉस्टन चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये होणार आहे. लीजा अत्यंत धैर्यवाय असून या संकटातून विजयी होऊन येईन असे ती सांगितले. जेव्हा मला त्रास होतो, झोप येत नाही, तेव्ही मी प्रार्थना करते. ही प्रार्थनाच मला बळ पुरवते असे लीजा सांगते. एलिझाबेथ यांनी विम्याची कक्षा वाढविली होती, पण प्रवास आणि हॉटेल्स, औषधांसाठी मोठा खर्च येणार आहे. मुलीची शस्त्रक्रिया होऊन ती बरी व्हावी अशी आशा एलिझाबेथ करत आहेत.