प्रतिनिधी / इचलकरंजी
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे जिल्हा पोलीस दलात एक दोन दिवसात काही पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
गेल्या आठवड्यात इचलकरंजी शहर वाहतुक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह जिल्ह्यातील सहा सहाय्यक पोलीस निरीक्षकाची पदोन्नतीवर जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे इचलकरंजी शहर वाहतुक नियंत्रण शाखेसह जिल्हा सायबर पोलीस, इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यासह अन्य पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाची पदे रिक्त झाली आहेत.तर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश निकम हे गेल्या महिन्या अखेरीस सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पद रिक्त झाले आहे. या सर्व रिक्त झालेल्या पदावर एक या दोन दिवसात नवीन पोलीस अधिकाऱ्याची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.