प्रतिनिधी / मिरज
मिरजेत किल्ला भागातील खंदकामध्ये अद्ययावत भाजी भाजी मंडईचे बांधकाम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. मात्र आता लाईन आऊटला मंजुरी घेऊन येत्या वीस दिवसात सदर भाजी मंडईचे काम निश्चितपणे सुरू करू, असे आश्वासन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिले. ते मी मिरजकर फाउंडेशन तर्फे आयोजित केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.
शहरात पाच ओपन जिम सुरू करण्याविषयीच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करणार असून, सिव्हील हॉस्पिटल चौक ते शास्त्री चौक हा रस्ता राष्ट्रीय मार्गाच्या अखत्यारीत येतो. व त्यासंबंधी मंजुरी मिळाली असून पुढील कामाबाबत कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करू असेही महापौर सूर्यवंशी म्हणाले.