प्रतिनिधी/ रत्नागिरी
संगमेश्वर येथील 10 वर्षाच्या मुलीशी गैरप्रकार करणाऱयाला न्यायालयाने 5 वर्ष सक्तमजुरी व 5 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावल़ी प्रणित उर्फ सोनू सतीश सावंत (29, वाशीतर्फे देवरूख त़ा संगमेश्वर) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आह़े
विशेष पॉक्सो न्यायाधीश व्ह़ी एस. राऊत यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा सरकारी पक्षातर्फे ऍड. मेघना नलावडे यांनी काम पाहिल़े या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 नोव्हेंबर 2019 रोजी पीडित मुलीचे आजोबा तापाने आजारी होत़े यावेळी पीडित मुलगी आपल्या आजीसोबत एरंडाची पाने आणण्यासाठी घरालगतच्या जागेत गेल़ी यावेळी आरोपी प्रणित त्या ठिकाणी आल़ा पीडित मुलीला आपण घरी सोडू, असे प्रणितने तिच्या आजीला सांगितल़े प्रणित पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या ओळखीचा असल्याने आजी प्रणितजवळ मुलीला सोडून घरी आल़ी या संधीचा फायदा उठवून प्रणितने पीडित मुलीशी गैरप्रकार केल़ा, मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल़े घाबरलेल्या मुलीने घरी परतताच सर्व हकिगत नातेवाईकांना सांगितल़ी
या बाबत पीडित मुलीच्या कुटुंबियांनी प्रणित याच्याविरूद्ध देवरूख पोलिसांत तक्रार दाखल केल़ी पोलिसांनी प्रणित यांच्याविरूद्ध भादंवि कलम 354, 506 व बालकांचे लैगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा दाखल केल़ा गुह्यांचा तपास पोलीस निरीक्षक निशा जाधव व पोलीस उपनिरीक्षक प्राची पवार यांनी केला व आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल़े खटल्यादरम्यान सरकारी पक्षाकडून एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आल़े न्यायालयाने प्रणित याला दोषी मानून शिक्षा ठोठावल़ी या प्रकरणी पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक एस़ आऱ आयरे यांनी काम पाहिल़े