कोरोना बळीमध्ये आजऱ्यातील 2, शिरोळ, हातकणगंलेतील प्रत्येकी 1
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यातील चौघांचा गुरूवारी कोरोनाने मृत्यू झाला. कोरोना बळींमध्ये आजरा तालुक्यातील 2 तर शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. कोरोना बळीमध्ये शिरोळ तालुक्यातील महिलेचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 81 नवे रूग्ण दिसून आले आहेत. सक्रीय रूग्णसंख्या 645 वर पोहोचली आहे. तसेच 34 जण केरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 49 हजार 149 झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली., दरम्यान, शहरात 309 पॉझिटिव्ह रूग्ण होम कोरोंटाईन असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
कोरोनाने गुरूवारी सीपीआर हॉस्पिटलमध्ये आजरा तालुक्यातील सोतळे येथील 80 वर्षांच्या पुरूषाचा मृत्यू झाला. इचलकरंजी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये शिरोळ तालुक्यातील यड्राव आर. के. नगर येथील 56 वर्षीय महिला आणि हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील 58 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये आजरा तालुक्यातील चव्हाणवाडी उत्तूर येथील 67 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. चार मृत्यूमुळे कोरोना बळींची संख्या 1 हजार 763 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 857, नगरपालिका क्षेत्रात 352, कोल्हापूर शहरात 390 तर अन्य 164 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 34 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 49 हजार 149 झाली आहे.
जिल्हात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 81 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 1, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 12, कागल 3, करवीर 20, पन्हाळा 1, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 12, कोल्हापूर शहरात 23 तर अन्य 9 जणांचा समावेश आहे. जिल्हात रविवारी 1390 जणांची तपासणी केली. त्यातील 183 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. कोरोना रूग्णसंख्या 645 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून आलेल्या 375 अहवालापैकी 320 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 136 अहवाल आले. त्यातील 129 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 327 रिपोर्ट आले. त्यातील 287 निगेटिव्ह आहेत. जिह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 51 हजार 557 आहेत. त्यापैकी 49 हजार 149 कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 645 रुग्ण उपचार घेत आहेत. शहर आणि परिसरात 309 तर ग्रामीण भागात 112 जणांना होम कोरोंटाईन केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माळी यांनी दिली.
जिल्हात 81 नवे रूग्ण, 34 कोरोनामुक्त,
शहरात 309 पॉझिटिव्ह रूग्ण होम कोरोंटाईन
कोरोना रूग्ण 81 : एकूण : 51557
कोरोनामुक्त 34 : एकूण : 49149
कोरोना मृत्यू : 4 : एकूण मृत्यू : 1763
सक्रीय रूग्ण : 645