इ-एज्युकेशन सिरीजअंतर्गत टॅब्लेट दाखल ः 9 हजारपासून 15 हजारपर्यंत किंमत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑनलाइन अभ्यासक्रमाचा वाढता कल लक्षात घेऊन लावा कंपनीने आपले नवे टॅब्लेट भारतीय बाजारात नुकतेच उतरवले आहेत. ऑनलाइन स्टडीसाठी उपयुक्त ठरणारे इ-एज्युकेशन सिरीजअंतर्गतचे नवे टॅब्लेट कंपनीने दाखल केले आहेत.
तीन प्रकारचे विविध स्क्रीन्सच्या आकाराचे टॅब्लेट असणार असून ज्यांची किमत 9 हजार 499 रुपये ते 15 हजार 499 रुपये इतकी असणार आहे. सुरूवातीला खरेदी करणाऱया ग्राहकांना सदरच्या टॅब्लेटच्या खरेदीवर 3 हजार 500 रुपयापर्यंत सवलत मिळणार असल्याचे लावा कंपनीने सांगितले आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळासह फ्लिपकार्टवर टॅब्लेट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलाय. मॅग्नम एक्सएल, ऑरा आणि आयव्हरी या नावाने असे तीन टॅब्लेट बाजारात दाखल केले असून मोठी स्क्रीन, दमदार बॅटरी आणि मधुर आवाजाचा दर्जा ही तीन वैशिष्ठय़े यांची सांगितली जात आहेत.
‘एज्युसक्षम’सोबत भागीदारी
लावाने एज्युसक्षमसोबत भागीदारी केली असून याअंतर्गत ऑनलाइन शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना सोयीस्करपणे घेता येणार आहेत. काही मोफत कोर्सेसचा लाभ टॅब्लेट खरेदीदारांना घेता येणार आहे. ऑनलाइन क्लासेस, एज्युकेशन ओरीयंटेड युटय़ुब चॅनेल्स, इ-बुक, टॅब सर्व प्रकारच्या प्लॅटफॉर्मचा वापर यावर सहजपणे करता येतो, असा कंपनीचा दावा आहे.
ऑरा
?किमत- 12 हजार 999 रुपये
8 इंच डिस्प्ले
? बॅटरी- 5 हजार 100 एमएएचची बॅटरी
? स्टोरेज- 32 जीबी ते 256 जीबीपर्यंत
?कॅमेरा- 5 मेगापिक्सलचा प्रंट तर 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
?प्रोसेसर- मीडियाटेक 2 जीएचझेड क्वाड कोर प्रोसेसर
? रंग- मेटालिक फिनीश
आयव्हरी –
?किंमत- 9 हजार 499 रुपये
7 इंचाचा डिस्प्ले
? स्टोरेज- 16 जीबी ते 256 जीबीपर्यंत
?कॅमेरा- 2 मेगापिक्सल सेल्फी व 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
मॅग्नम एक्सएल
?किंमत- 15 हजार 499 रुपये- 10 इंच डिस्प्ले
?बॅटरी-6 हजार 100 एमएएचची बॅटरी
? स्क्रीन- आयपीएस एलसीडी पॅनेल
?कॅमेरा- 2 मेगापिक्सल प्रंट आणि
5 मेगापिक्सल रियर कॅमेरा
?स्टोरेज- 32 जीबी ते 256 जीबीपर्यंत
?प्रोसेसर- मीडियाटेक 2 जीएचझेड क्वाड कोर प्रोसेसर
?रंग- गडद ग्रे आणि मेटालिक फिनीश