प्रतिनिधी / सांगली
सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारातील अर्धवट स्थितीत असलेल्या ऑक्सीजन यंत्रणेचे काम ताबडतोब पूर्ण करण्यात यावे अशी मागणी नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी केले आहे. याबाबतचे निवेदन त्यानी पालकमंत्री जयंत पाटील कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांना दिले आहे.
कोविड-19 मे 2020 मध्ये ज्यावेळी सांगली जिल्ह्यात प्रादूर्भाव वाढला होता, त्यावेळी प्रचंड मोट्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. वसंतरावदादा सरकारी दवाखान्यासाठी ऑक्सिजन यंत्रणा उभारणीसाठी 3 कोटी रुपये मंजूर झाले होते. त्याची टेंडर प्रक्रिया प्रलंबित होती. नागरिक जागृतीमंचवतीने आंदोलनाचा इशारा व पाठपुरावा केल्यानंतर ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती. अजूनही सदर प्लँट अर्धवट अवस्थेत आहे.
दुसरी लाट सुरू झाली आहे व बेड सुद्धा संपत चाललेले आहेत, ह्याचा विचार करता तात्काळ अपूर्ण ऑक्सिजन प्लांटचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे असे आदेश मिरज मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता यांना द्यावेत व सदर काम का रेंगाळले आहे त्याची मा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत चौकशी करण्यात यावी व संबंधित दोषी अधिकारी कर्मचारी यांचे वर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आंदोलन करावे लागेल . तसेच गेल्या वेळी झालेल्या चुका परत होऊ नयेत ह्या साठी कोविड -19 आढावा विशेष मीटिंग घेऊन सर्व यंत्रणा कार्यक्षम व सुसज्ज करावी अशी मागणी सतीश साखळकर यांनी केली आहे.