वृत्तसंस्था/ हैद्राबाद
येथे रविवारी समाप्त झालेल्या तिसऱया फेझा दुबई आंतरराष्ट्रीय पॅराबॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पॅराबॅडमिंटनपटूंनी दर्जेदार कामगिरी करताना पाच सुवर्ण, 6 रौप्य आणि 10 कास्य अशी एकूण 21 पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत पुरूष एकेरीच्या एसएल 3 मध्ये भारताच्या प्रमोद भगत, पुरूष एकेरीच्या एसएच 6 मध्ये कृष्णा नागर, मिश्र दुहेरीच्या डब्ल्यू एच 1, डब्ल्यू एच 2 मध्ये प्रेमकुमार ऍले, पुरूष दुहेरीच्या एसएच 6 मध्ये कृष्णा नागर आणि राजा मेगोत्रा, पुरूष दुहेरीच्या एसएल 3, एसएल 4 मध्ये प्रमोद भगत आणि मनोज सरकार यांनी भारताला सुवर्णपदके मिळवून दिली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय पदकातील तीन बॅडमिंटनपटूंनी प्रत्येकी 3 पदकांची कमाई केली. प्रमोद भगतने 2 सुवर्ण, 1 कास्य, पलक कोहलीने 1 रौप्य आणि 2 कास्य, प्रेमकुमार ऍलेने 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कास्यपदक पटकाविले. महिलांच्या विभागात भारताच्या पलक कोहली, मानसी जोशी, पुरूष विभागात नितेशकुमार, सुकांत कदम, नितेशकुमार यांनी रौप्य पदकांची कमाई केली आहे.