वाळपई/प्रतिनिधी
अमाप उत्साह व प्रत्येकाच्या अंगामध्ये भरलेली ओतप्रोत पारंपरिक कला यांच्या साक्षीने शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत सत्तरी तालुक्मयातील करंझोळ येथील श्री सातेरी ब्राह्मणी देवस्थानचा पारंपारिक चोरोत्सव शनिवारी रात्री साजरा करण्यात आला. यावेळी गोव्याच्या वेगवेगळय़ा भागातून मोठय़ा प्रमाणात नागरिक हा पारंपारिक चोरोत्सव पाहण्यासाठी उपस्थित होते. रात्री उशिरा दहापर्यंत हा उत्सव साजरा करण्यात येत होता. त्यानंतर पारंपरिक घोडेमोडणी उत्सव साजरा करण्यात आला. गोव्यातील पारंपारिक कलेचा जोशपूर्ण असा हा उत्सव सत्तरी तालुक्मयातील करंझोळ गावांमध्ये शेकडो वर्षापासून साजरा करण्यात येत आहे. पारंपारिकतेमध्ये कोणत्याही प्रकारची कमी भासणार नाही याची खात्री करत गावातील नागरिक हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करत असतात. शेकडो वर्षापासून हा चोर उत्सव शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न होत असतो. यंदाही अशाच प्रकारे हा उत्सव साजरा करण्यात आला.
संध्याकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान गावातील मांडावर सार्वजनिक सांगणे करण्यात आले. पूर्णपणे पारंपारिकरित्या साजरा करण्यात येत असलेला हा चोर उत्सव यंदा सर्वांच्या साक्षीने अमाप उत्साहाने साजरा करण्याची शक्ती देवीने सर्वांना द्यावी अशा प्रकारचे साकडे घालत सत्तरी तालुक्मयातील प्रत्येक गावातून आलेल्या गावुणग्याना मान देत याला प्रारंभ करण्यात आला. करझोळ गावामध्ये साजरा करण्यात येणाऱया चोर उत्सवाच्या माध्यमातून सत्तरी तालुक्मयातील गाघे गावुणगे याना याना एक विशिष्ट असा मान असतो. असा हा उत्क?ठापूर्वक सोहळा पाहण्यासाठी शेकडो नागरिक खास करून उपस्थित होते .त्यानंतर सार्वजनिक सांगणे झाल्यानंतर जोशपूर्ण अवस्थेत ही सर्व मंडळी श्री सातेरी ब्राह्मणी देवस्थानच्या प्रांगणात जातात व त्या ठिकाणी उत्सव साजरा करण्यात येत असतो. सदर ठिकाणी गेल्यानंतर देवस्थानच्या मंदिरात सर्व गावुणग्य्याना विशेष सन्मान दिला जातो .यावेळी तीर्थ देणे कुंकुमतिलक लावणे व व इतर स्वरूपाचे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले .तदनंतर पारंपरिक उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. चोरो??त्सवव व्रत पाळणारे आठ गडे यामध्ये सहभागी झाले होते. पैकी चार गडे डोक्मयाने तर चार कमरेने जमिनीत पुरण्यात आले होते. तर एक सुवारी दुसरा मुड्डयाचा चोर असे चित्र दाखविण्यात आले होते.
सदर पारंपरिकता पाहण्यारसाठी सभोवताली नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल असा नारा देत हा चोर उत्सव साजरा करण्यात येत होता. पारंपारिक वादन व व साजरा करण्याची वेगळी प्रथा यामुळे या चोर उत्सवाला चांगल्या प्रकारचा उत्साह पाहायला मिळाला. तद्न?तर पारंपरिक घोडेमोडणी साजरी करण्यात आली. हा उत्सव रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यात करंझोळ सातेरी ब्राह्मणी देवीचे दोन तर कुमठोळ येथील देवीचा 1 घोडा घोडेमोडणीत रात्री उशिरापर्यंत गावच्या मांडय़ावर साजरी करण्यात आली होती.
या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना गावचे ज्ये÷ नागरिक हरिश्चंद्र गावस यांनी सांगितले की शेकडो वर्षांपासून ही परंपरा आजही त्याच उत्साहाने व उन्मेशाने साजरी करण्यात येत आहे.यामध्ये नागरिक मोठय़ा प्रमाणात सहभागी होतात. त्याचप्रमाणे हा उत्सव म्हणजे साठा सत्तरीच्या उत्सव असून प्रत्येक गावुणगे याना सन्मानित करण्यात येत असते .जे÷ नागरिक अर्जुन केरकर यांनी या गावची इतिहासाची ओळख ही वेगळय़ा प्रकारे असून आतापर्यंत या गावाने पोर्तुगीज यांच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात संघर्ष केल्याचा इतिहास अनेक पुस्तकांमध्ये नोंद झालेला आहे .
त्यांनी यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त करताना गावांमध्ये दरवषी साजरा करण्यात येणारा उत्सव हा या गावची वेगळय़ा प्रकारची प्रति÷ा जपणारा असून गोमंतकामधील पारंपारिक स्तरावर वेगळी अशी शैली निर्माण करणारा आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणारा हा गाव स्वाभिमानी जनतेमुळे ही वेगळी अशी ओळख निर्माण करणारा असून दरवषी साजरा करण्यात येणारा हा उत्सव म्हणजे सर्व गावातील नागरिकांना एक वेगळय़ा प्रकारची संधी निर्माण करून देणार असल्याचे निवेदन केले.
यंदा जागतिक स्तरावर करोना रोगा संदर्भात निर्माण झालेली गंभीर स्वरूपाची परिस्थिती अशा अवस्थेतही पारंपरिक पद्धतीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी गोव्याच्या वेगळय़ा भागातून मोठय़ा प्रमाणात शिगमोत्सव प्रेमी व नागरिक उपस्थित होते.