सक्रिय रुग्णसंख्याही 310 वर, 879 अहवाल निगेटिव्ह
प्रतिनिधी / बेळगाव
रविवारी जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्येने पंच्याहत्तरी गाठली आहे. यावषीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा आहे. तर सक्रिय रुग्णसंख्याही 310 वर पोहोचली असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतीच आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 27 हजार 600 वर पोहोचली आहे. त्यापैकी 26 हजार 923 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. सध्या 310 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. अद्याप 36 हजार 813 जण चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. तर 2 हजार 099 जणांचे अहवाल यायचे आहेत. गेल्या 24 तासांत 879 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे.
रविवारी पॉझिटिव्ह आलेल्या 75 पैकी 33 जण बेळगाव शहर व तालुक्मयातील आहेत. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. किणये, मजगाव, गणेशपूर, जाधवनगर, टिळकवाडी, शहापूर, राणी चन्नम्मानगर, काळी आमराई, विनायकनगर, वडगाव, महांतेशनगर, सहय़ाद्रीनगर, सदाशिवनगर, कॅम्प, टीव्ही सेंटर, क्लब रोड, मारुती गल्ली, हनुमाननगर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून सदाशिवनगरात 6 व टिळकवाडी परिसरात 7 रुग्ण आढळून आले आहेत.
तर जिल्हय़ातील लोकुर, ता. अथणी, सौंदत्ती, ब्याकुड, ता. रायबाग, यरझरवी, ता. सौंदत्ती, यक्पुंडी, कागवाड, चिकोडी, कुडची, इंचल, निपाणी, सवदी, उगार खुर्द, मलाबाद, कोचरी, रामदुर्ग, शिरगाव,
यमकनमर्डी, बैलहोंगल, गोकाक परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अथणी तालुक्मयात पुन्हा रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. गेल्या वषीही अथणी तालुक्मयात सक्रिय रुग्णांची संख्या मोठी होती.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने काटेकोर नियम जारी केले आहेत. स्वीमिंग पूल, जिम बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला असून चित्रपटगृहात तूर्त 100 टक्के उपस्थितीला परवानगी दिली असली तरी 7 एप्रिलनंतर ही संख्या 50 टक्के इतकी करण्यात येणार आहे. विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत चालली असली तरी बाजारपेठेत मात्र सर्व नियम पायदळी तुडवून विनामास्क फिरणाऱयांची संख्या अधिक आहे.