प्रतिनिधी / निपाणी
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र, कोल्हापूर विभागामार्फत एन. यु. जे. महाराष्ट्र सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निपाणीतील प्रसिद्ध रत्न व्यापारी ए. एच. मोतीवाला यांचा रत्नशाश्त्री पदवीने सन्मान करण्यात आला. संजय घोडावत विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले होते.
यावेळी रत्नशाश्त्री ए. एच. मोतीवाला म्हणाले, कै. एच. ए. मोतीवाला यांचे अमुल्य मार्गदर्शन मिळाले होते. आज शुभरत्न केंद्राच्या माध्यमातून सहावी पिढी रत्नशास्त्राचा व्यवसाय करीत आहे. समाजाच्या सेवेबरोबर व्यावसायिक दृष्टिकोनातून लोकांचा मिळविलेला विश्वास म्हणजे हा सन्मान आहे. लोकसेवेसाठी सन्मान प्रेरणा देणारा असून यापुढेही व्यावसायिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात राहून युवकांना प्रोत्साहन व व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी उपक्रम हाती घेणार असल्याचे सांगितले. यावेळी संजय घोडावत विद्यापीठाचे प्राचार्य गिरी, डॉ. जसिका अँड्रय़ूस, तेजस्विनी पाटील, नुसरत शाहनूर मुजावर, मलेकाखानम महंमदशफी पटेल, नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. सुभाष सामंत, उपाध्यक्ष विनयकुमार पाटील, सचिव शेखर धोंगडे, जिल्हा कार्याध्यक्ष पोपटराव वाकसे, कोषाध्यक्ष भुपेश कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.