वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू महिन्याच्या अखेरीस भारतीय ऍथलीट्सकरिता सरावासाठी तुर्कीचा दौरा आयोजित केला आहे. भारतीय ऍथलेटिक्स क्षेत्रातील आघाडीचे ऍथलीट भालाफेक करणारा निरज चोप्रा आणि धावपटू हिमा दास सज्ज झाले आहेत. सदर माहिती अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली.
तुर्कीच्या दौऱयात ऍथलेटिक्स स्पर्धा घेतली जाणार असून या स्पर्धेने भारतीय ऍथलीटस्ना सरावाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या दौऱयासाठी प्रशिक्षकवर्गासह 40 जणांचे भारतीय ऍथलेटिक्स पथक पाठविले जाणार आहे. तुर्कीतील अँटेलिया येथे काही स्पर्धा आयोजित केल्या आहेत. टोकियो ऑलिंपिक पात्रतेसाठी भारताच्या काही ऍथलीटस्ना हा तुर्की दौरा महत्त्वाचा राहणार आहे. भारताची महिला धावपटू हिमा दासने 2018 च्या आशियाई क्रीडास्पर्धेत वैयक्तिक 400 मी. धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक तर महिलांच्या 4ƒ400 रिले तसेच मिश्र 4ƒ400 मी. रिलेमध्ये प्रत्येकी एक सुवर्णपदक पटकाविले. पोलंड येथे 1 आणि 2 मे रोजी होणाऱया विश्व ऍथलेटिक्स रिलेमध्ये भारताचे रिले संघ सहभागी होणार आहेत. भारतीय रिले संघ तुर्कीतून थेट पोलंडमध्ये दाखल होणार आहे..