वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रसार झपाटय़ाने वाढत असल्याचे चित्र स्पष्ट झाल्याने आता एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱया विविध राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेने घेतला आहे. बेंगळूरमध्ये 18 ते 25 एप्रिल दरम्यान राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा तसेच मे महिन्यात हैद्राबाद येथे कनिष्ठ आणि उपकनिष्ठांची बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केली होती पण आता या दोन्ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष हिमांता बिश्वा यांनी दिली. नवी दिल्लीत 11 ते 16 मे दरम्यान होणाऱया इंडियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.