प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारात आता खानापूर म. ए. युवा समितीनेही सहभाग घेतला आहे. राजहंसगड, देसूर, नंदिहळ्ळी या मराठीबहुल भागामध्ये युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी शुभम शेळके यांच्यासोबत जोरदार प्रचार केला.
शुभम शेळके यांना उमेदवारी दिल्यापासून तरुणांमधून मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.
त्यांच्या प्रचारासाठी खानापूर म. ए. युवा समिती धावून आली आहे. तालुक्मयातील विविध गावांमध्ये जाऊन प्रचार केला जात आहे. यावेळी अध्यक्ष धनंजय पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष परशराम नावलकर, सचिव सदानंद पाटील, खजिनदार परशराम गोरे, आनंद झुंजवाडकर, ज्ञानेश्वर सनदी, भुपाल पाटील, राजू पाटील, नागेश कोलेकर यांच्यासह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.