105 मिनिटांत वाचली 36 पुस्तके
ऑनलाईन टीम / अबूधाबी :
भारतीय वंशाच्या 5 वर्षीय किआरा कौरने 105 मिनिटांत तब्बल 36 पुस्तके वाचून नवा विक्रम केला आहे. तिचा हा विक्रम लंडन वर्ल्ड बुक रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आला आहे.
किआराने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मला लहानपणापासूनच वाचनाची आवड आहे. आजोबांमुळे मला ही सवय लागली असून, वाचन हा माझा आवडता छंद आहे. रंगीत छायाचित्रे असलेली सिंड्रेला, एलिस इन वंडरलँड्स अशी पुस्तके मला वाचायला आवडतात.
किआरा बराच वेळ व्हॉट्सॲपवर आजोबांकडून गोष्ट ऐकत असते. त्याचा किआरावर चांगला परिणाम झाला असून, मोठे होऊन डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न असल्याचे तिच्या आईने सांगितले.