नवी दिल्ली
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रो मागच्या आर्थिक वर्षातील 31 मार्च 2021 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीमध्ये एकूण निव्वळ नफा 27.7 टक्क्यांनी वधारुन 2,972 कोटी रुपयाच्या घरात पोहोचला आहे. यामध्ये मागच्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत कंपनीला 2,326.1 कोटी रुपयाचा लाभ झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार सदर तिमाही दरम्यान उत्पन्न 3.4 टक्क्यांनी वाढून 16,245.4 कोटी रुपये झाले आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कंपनीचा एकूण निव्वळ नफा 11 टक्क्यांनी वाढून 10,796.4 कोटी रुपयावर पोहोचला आहे. मागच्या आर्थिक वर्षात(2019-20) तो 9,722.3 कोटी रुपये राहिल्याची नोंद केली आहे.