प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने 12 जणांचा मृत्यू झाला तर दिवसभरात 452 नवे रूग्ण दिसून आले. कोरोनाच्या या उद्रेकामुळे शिवाजी विद्यापीठातील डीओटी सेंटर फुल्ल झाले आहे. जिल्ह्यात 47 केअर सेंटर तातडीने सुरू झाली आहेत. सक्रीय रूग्णसंख्या 3 हजारांवर गेली आहे. आजपर्यत कोरोना रूग्णांचा आकडा 56 हजारांवर तर कोरोनामुक्तांचा आकडा 51 हजारांवर पोहोचला आहे. दिवसभरातील कोरोनाने बळींत 3 परजिल्ह्यांतील आहेत.
जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे, तरीही रूग्णसंख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत सीपीआर हॉस्पिटलमध्ये करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथील 65 वर्षीय महिला, शुक्रवार पेठेतील 70 वर्षीय पुरूष, भुदरगड तालुक्यातील कडगाव येथील 75 वर्षीय पुरूष, शाहूवाडी तालुक्यातील पांडंरे येथील 50 वर्षीय महिला, यादवनगर येथील 50 वर्षीय महिला, कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील 50 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.
गडहिंग्लज येथे उपजिल्हा रूग्णालयात आजरा तालुक्यातील महागोंड येथील 57 वर्षीय पुरूष, गडहिंग्लज तालुक्यातील मानवाड येथील 64 वर्षीय पुरूष आणि हलकर्णी येंथील 61 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. इचलकरंजी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये सांगली जिल्ह्यातील संभाजी चौक (हरीपूर) येथील 57 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. शास्त्रीनगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भैरवडे (ता. कणकवली) येथील 81 वर्षीय पुरूष आणि गडहिंग्लज येथील खासगी हॉस्पिटलमध्ये बेळगाव जिल्ह्यातील अंकली (ता. हुक्केरी) येथील 68 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. दुसऱया लाटेतील सप्ताहभरातील हे उच्चांकी बळी आहेत.
दिवसभरातील 12 बळींमुळे आजपर्यत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 856 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 897, नगरपालिका क्षेत्रात 357, शहरात 420 तर अन्य 182 जण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली. गेल्या 24 तासांत 2 हजार 373 जणांची तपासणी केली. त्यातील 499 जणांची अँटीजेन टेस्ट केली आहे. जिल्ह्Îातील सक्रीय रूग्णसंख्या 3 हजार 150 वर पोहोचली आहे. तसेच 219 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 51 हजार 129 झाली आहे.
गेल्या 24 तासांत 452 नवे रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 17, भुदरगड 17, चंदगड 5, गडहिंग्लज 4, गगनबावडा 1, हातकणंगले 57, कागल 16, करवीर 50, पन्हाळा 20, राधानगरी 3, शाहूवाडी 4, शिरोळ 12, नगरपालिका क्षेत्रात 23 कोल्हापुरात 192 तर अन्य 31 जणांचा समावेश आहे. कोरोना रूग्णांची एकूण संख्या 56 हजार 135 झाली आहे. शहरात 599 तर ग्रामीण भागात 1 हजार 50 जणांना होम कोरोंटाईन केले आहे.
ग्रामीणमध्ये 1 हजार तर शहरात 600 वर कोरोंटाईन
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून 1 हजार 959 अहवाल आले. त्यापैकी 1 हजार 603 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 345 अहवाल आले. त्यातील 276 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 497 रिपोर्ट आले. त्यातील 391 निगेटिव्ह आहेत. सध्या 3 हजार 150 रुग्ण उपचार घेत आहेत. ग्रामीण भागात 960 तर शहरात 616 जण होम कोरोंटाईन झाले आहेत.
शिवाजी विद्यापीठातील डीओटी सेंटर फुल्ल
शिवाजी विद्यापीठातील डीओटी सेंटरमध्ये 150 बेडची व्यवस्था आहे. शुक्रवारी रात्री त्यातील 145 बेड फुल्ल झाले होते. हे डीओटी सेंटर फुल्ल झाल्याने आणखी एका इमारतीत कोरोना रूग्णांना ठेवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सीपीआरमधील चार इमारतींत सध्या 180 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी सीपीआर हॉस्पिटल पुर्णपणे कोरोनासाठी खुले होणार आहे. सध्या 47 हेल्थ, 24 केअर सेंटर सुरू आहेत. रूग्णसंख्या वाढल्याने त्यांची संख्या वाढवण्यात येत आहे.