बेळगाव परिसरात 75 रुग्ण, युवकाचा मृत्यू
प्रतिनिधी / बेळगाव
सलग तिसऱया दिवशी बेळगाव जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्येने दीडशेचा टप्पा पार केला. रविवारी 156 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून बेळगाव शहर व उपनगरांतील 75 जणांचा समावेश आहे, तर 43 वर्षीय कोरोनाबाधित युवकाचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णसंख्येने 924 चा आकडा गाठला आहे.
दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. 16 व 17 एप्रिल रोजी 175 रुग्ण आढळून आले होते. रविवारी 156 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून बाधितांची संख्या 28 हजार 850 च्या घरात पोहोचली आहे. आतापर्यंत 27 हजार 541 जणांनी कोरोनावर मात केली असून मृतांचा आकडा 354 वर पोहोचला आहे.
रविवारी जिल्हा सर्वेक्षण विभागाच्या माहितीनुसार जिल्हय़ात अद्याप 924 रुग्ण आहेत. लक्षणे नसणाऱयांवर घरीच तर श्वसनाचा त्रास असणाऱयांवर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
बेळगावात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन खासगी इस्पितळांनी कोविड विभाग सुरू केले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी 200 बेड उपलब्ध असून रुग्णसंख्या लक्षात घेऊन यात वाढ करण्यात येणार आहे.
रविवारी देसूर, गणेशपूर, हंदिगनूर, हंगरगा, मण्णीकेरी, पिरनवाडी, सरस्वतीनगर-गणेशपूर, मुतगा, अयोध्यानगर, बसव कॉलनी, भाग्यनगर, बिम्स हॉस्टेल, चौगुलेवाडी, गुड्सशेड रोड, हनुमाननगर, कॅम्प, हिंडलगा, जाधवनगर, कावेरीनगर, लक्ष्मीनगर, महांतेशनगर, रामतीर्थनगर, सदाशिवनगर, सहय़ाद्रीनगर, शिवाजीनगर, शास्त्राrनगर, टीव्ही सेंटर येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
आहेत.
यरगट्टी, अथणी, बैलहोंगल, अवरादी, बेडकिहाळ, चिकोडी, चिकुंबी, यादवाड, रुद्रापूर, दोडवाड, गोकाक, हळ्ळूर, हंचनाळ, सौंदत्ती, इनाम होंगल, किरणगी, खवटकोप्प, उगार खुर्द, कोण्णूर, कुसनाळ, मंगावती, मोळे, मुनवळ्ळी, मुरगोड, नागनूर, निपाणी, पाच्छापूर, संकेश्वर, रामदुर्ग, कित्तूर परिसरातही कोरोना रुग्ण आढळले असून रविवारी बाधितांच्या यादीत लहान मुलांचा भरणा अधिक आहे.
स्वयंप्रेरणेने तपासणी करून घ्या
परराज्य, परगावांहून येऊन आठवडाभरापेक्षा जास्त काळ बेळगावात राहिलेल्या कुटुंबीयांनी स्वयंप्रेरणेने इस्पितळात कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी केले आहे. आपले कुटुंब व समाजाच्या आरोग्याच्यादृष्टीने नागरिकांनी स्वतःहून तपासणी करून घ्यावी. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास योग्य उपचार करून घ्यावेत. स्वयंप्रेरणेने तपासणीसाठी येणाऱयांसाठी सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. तपासणी करून त्यांना लवकरात लवकर अहवाल मिळेल, याची व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.