ऑनलाईन टीम / नागपूर :
नागपूरमध्ये संसर्ग वाढीचा आलेख वाढताच असून आज दिवसभरात 6,890 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 91 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 36 हजार 360 वर पोहोचली आहे.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 5,504 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2 लाख 58 हजार 191 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
- 6,477 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी
सद्य स्थितीत नागपूरमध्ये 71,692 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 6,477 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला.