- शीना बोरा प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा देखील समावेश
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत आहे. या विषाणूने आता जेलमध्ये बंद असणाऱ्या कैद्यांना देखील आपली शिकार बनवले आहे. भायखळा जेलमधील तब्बल 38 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या 38 बाधितांमध्ये शीना बोरा हत्याकांडामधील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा देखील समावेश आहे. इंद्राणी मुखर्जीला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात 19 एप्रिलपर्यंत 46 जेलमधील 197 कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एवढेच नाही तर कोरोनामुळे 7 कैद्यांचा मृत्यू देखील झाला आहे. तर 96 पेक्षा अधिक जेल कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 8 जणांनी आपला जीव गमावला आहे.
- जेलमध्ये का आहे इंद्रायणी मुखर्जी ?
2012 रोजी शीना बोरा हत्याकांड उजेडात आले होते. या प्रकरणी तिची आई आणि मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला अटक करण्यात आली होती. शीना बोरा ही इंद्राणीची मुलगी असून तिची हत्या साल 2012 मध्ये इंद्राणीने घडवून आणली होती आणि त्यानंतर मुलीचे प्रेत जवळील रायगड जिल्ह्यातील एका जंगलात फेकले होते. 2015 मध्ये इंद्रायणीला या प्रकरणात आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. या कटाची संपूर्ण माहिती इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीलाही होती, त्याला देखील या प्रकरणातील आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे.