बेंगळूर/ प्रतिनिधी
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्नाटक राज्य सरकारवर निसाणा साधला आहे. कोरोना साऱख्या गंभीर परस्थितीमध्ये कर्नाटक राज्य सरकार जाहिरातीमध्ये कोट्यावधी पैसे खर्च करून लोकांची चेष्ठा करत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
कुमारस्वामी यांनी ट्वीट करत, नम्म मेट्रो प्रकल्पाच्या २ ए व २ बी या टप्प्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळाल्यानंतर राज्य कारकडून मोठी जाहिरात देण्यात आली आहे. यातून राज्य सरकारची असंवेदनशीलता दिसून येते. सध्या राज्यात कोरोनाची स्थिती काय आहे हे कोणापासून लपलेले नाही.
लोकांना ऑक्सीजन, बेड मिळत नसल्याने रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशा गंभीर परस्थितीमध्ये जाहिरात देणे म्हणजे जनतेचा अपमान आहे. केंद्राकडून अशा योजनेंसाठी मिळाणारे अनुदान भीख नाही, तो तर राज्याचा आधिकार आहे. यासाठी जाहिरातीवर कोट्यावधी पैसे खर्च करण्याची गरज नाही. जनतेच्या कष्टाच्या पैसाचा हा गैरउपयोग नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या पैशाचा उपयोग योग्य कारणासाठी केला जाऊ शकत नाही का, असा देखील सवाल त्यांनी केला आहे. काँग्रेसकडून देखील यावरून निशाणा साधला आहे.