राजस्थानच्या डुंगूरपूर येथील घटना
राजस्थानातील एका पोलीस स्थानकात विवाह होणाऱया एका युवतीचा हळदीचा विधी पार पडला आहे. ही युवती एक पोलीस कॉन्स्टेबल आहे. आशा रोत हिचा विवाह 30 एप्रिल रोजी होणार आहे. शहरात लॉकडाउन असल्याने तिला सुटी मिळू शकलेली नाही. आशाचा हळदीचा विधी होणार होता, सुटी न मिळाल्याने सहकारी पोलीस कर्मचाऱयांनी कुटुंबाची जबाबदारी उचलत हा विधी पूर्ण केला आहे. यावेळी महिला कॉन्स्टेबल्सनी मंगल गीत म्हटले आहे. यानंतर आशाची सुटीही मंजूर झाली आहे.
आशा डुंगरपूर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावरील हिराता गावची रहिवासी आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने सध्या जनशिस्त पंधरवडय़ाची घोषणा केली आहे. आशा यादरम्यान सातत्याने कर्तव्य बजावत आहे. लॉकडाउनमध्ये डय़ुटीमुळे सुटी न मिळाल्याने ती घरी जाऊ शकत नव्हती. याचमुळे सर्व पोलीस कर्मचाल्यांनी आशाचा हळदीचा विवाह पोलीस स्थानकातच करण्याचा निर्णय घेतला. हे आवश्यक होते, कारण मूहुर्तानंतर हळदीचा विवाह होऊ शकत नाही असे पोलीस स्थानक प्रमुखांनी सांगितले आहे.
विवाह होणाऱया घरात हळदीच्या विधीसह उत्सवी वातावरण तयार होते. येथे चारपाईवर वधू-वर यांना हवेत उचलण्यात येते. गीत गायन केले जाते. पोलीस स्थानकात चारपाई नसल्याने खूर्चीवरच परंपरा पार पाडण्यात आली आहे. या परंपरेला ग्रामीण क्षेत्रात मूडिया आणि मुरजु म्हटले जाते.
एकदाच होतो विधी
आशाला या कार्यक्रमाची जाणीव होऊ दिली नव्हती. ती डय़ुटी करत असताना आम्ही तिला सरप्राइज दिले. पोलीस स्थानकात हा विधी झाल्याने आशाच्या गावात हा विधी होणर नाही. हळदीचा विधी एकदाच होतो अशी माहिती पोलीस स्थानक प्रभारी दिलीप दान चारण यांनी दिली आहे.
बंद दुकानात राहिला वधूचा पोशाखा
लॉकडाउनचा नियम तोडल्याप्रकरणी पोलिसांनी एक दुकान बंद केले होते. योगायोग म्हणजेच आशाने याच दुकानात वधूचा पोशाख बुक केला होता. यामुळे हा पोशाखही दुकानातच राहिला. बंदीचा काळ पूर्ण झाल्यावर दुकानदाराशी चर्चा करून हा पोशाख मिळविण्यात आला.