- एकाच दिवशी 13 जणांचा मृत्यू
- जिल्हय़ात 197 कोरोना पॉझिटिव्ह
- सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 894
- एका दिवसात 384 जणांना डिस्चार्ज
- 1457 बेड उपलब्ध, 695 बेडवर रुग्ण, 762 बेड शिल्लक
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोनाने मृत्यू होणाऱया रुग्णांची संख्या दररोज वाढतच असून सोमवारी एकाच दिवशी 13 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाने आतापर्यंत 281 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी 197 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी एकाच दिवशी 384 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.
श्रीपाद पाटील यांनी दिली. दरम्यान, जिल्हय़ात शासकीय व खासगी कोविड सेंटरमध्ये एकूण 1457 बेड उपलब्ध असून त्यापैकी 695 बेडवर रुग्ण दाखल आहेत. तर 762 बेड शिल्लक आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्हय़ात नव्याने 197 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आतापर्यंतची कोरोनाबधित रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 623 झाली आहे, तसेच 384 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत एकूण 8 हजार 443 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात 2 हजार 894 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
186 रुग्णांची प्रकृती चिंताजनक
जिल्हय़ात सध्या 2 हजार 894 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 186 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून 157 रुग्ण ऑक्सिजनवर तर 29 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
जिल्हय़ातील सद्यस्थिती : सोमवारचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण एकूण 197, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 11,626. सद्यस्थितीतील एकूण सक्रिय रुग्ण 2,894, सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्हय़ाबाहेर गेलेले रुग्ण सहा, सोमवारी बरे झालेले रुग्ण 384 तर आतापर्यंत 8,443. मृत झालेले सोमवारी 13 तर आतापर्यंत 280.
कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 58 रुग्ण
तालुकानिहाय नवे पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 6, दोडामार्ग – 2, कणकवली – 26, कुडाळ – 58, मालवण – 45, सावंतवाडी – 34, वैभववाडी -11, वेंगुर्ले – 12, जिल्हय़ाबाहेरील – 3.
तालुकानिहाय आजपर्यंत मिळालेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 1126, दोडामार्ग – 602, कणकवली – 3,042, कुडाळ – 2233, मालवण – 1244, सावंतवाडी – 1511, वैभववाडी – 668, वेंगुर्ले – 912, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – 85.
तालुकानिहाय सक्रिय रुग्ण : देवगड – 380, दोडामार्ग -124, कणकवली – 608, कुडाळ -391, मालवण -410, सावंतवाडी -351, वैभववाडी – 397, वेंगुर्ला – 182, जिल्हय़ाबाहेरील – 51.
तालुकानिहाय आजपर्यंतचे एकूण मृत्यू : देवगड – 27, दोडामार्ग – 8, कणकवली – 66, कुडाळ – 44, मालवण – 36, सावंतवाडी – 53, वैभववाडी – 27, वेंगुर्ले – 18, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – 1.
आरटीपीसीआर आणि ट्रुनॅटटेस्ट टेस्ट रिपोर्टस् : तपासलेले नमुने सोमवारी 402, एकूण 60 हजार 586, पॉझिटिव्ह आलेले नमुने 8,068.
ऍन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने : सोमवारी 155, एकूण 34 हजार 725. पैकी पॉझिटिव्ह 3,555.
जिल्हय़ात आणखी 13 जणांचा मृत्यू
सोमवारी आणखी 13 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक पाच जणांचे मृत्यू मालवण तालुक्मयात झाले असून त्यात मालवण-भरड येथील 59 वर्षीय, चौके येथील 70 वर्षीय, मेंढा येथील 60 वर्षीय तर मालवण येथील 65 वर्षीय अशा चार पुरुषांचा समावेश असून त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तसेच मालवण-वराड येथील 62 वर्षीय पुरुषाचा समावेश असून त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता.
सावंतवाडी-इन्सुली येथील 53 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे येथील 79 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. देवगड तालुक्मयातील कुणकवणे येथील 65 वषीय पुरुषाचा मृत्यू झाला असून त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. वैभववाडी-नाधवडे येथील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. तसेच वैभववाडी येथील 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असून त्यांना उच्च रक्तदाब होता. वेंगुर्ले-गाडीअड्डा येथील 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाब होता. उभादांडा येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांनाही उच्च रक्तदाब होता. कुडाळ-पडवे येथील 61 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाब होता.