प्रतिनिधी कोल्हापूर
कोल्हापुरात अचानक गारांचा पाऊस सुरु झाला. दिवसभर उष्णतेने लाही लाही झालेल्या नागरिकांना या गारांच्या पावसामुळे थंडावा मिळाला. मात्र अचानक सुरु झालेल्या या गारांच्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या गारा इतक्या मोठ्या होत्या की अक्षरश: घरावर दगडे पडत आहेत की काय असेच वाटत होते.
सायंकाळनंतर वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला. यानंतर काही वेळातच गारांच्या पावसाला जोरदार सुरुवात झाली. यामुळे रस्त्यावर गारांची झालर पसरली होती. मात्र या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरी बांधवामध्ये चिंतेचे वातावरण होते. गेल्या काही दिवसापुर्वीच वळीवाच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यातच आज पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली.
व्हिडिओ https://www.facebook.com/tarunbharatnewsofficial/videos/466715617880011