वार्ताहर / सांबरा
बाळेकुंद्री खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. चौथरा बांधकामाचे काम प्रगतिपथावर असून अंतिम टप्प्यात आले आहे. गावात शिवपुतळा बसविण्यात येणार असल्याने ग्रामस्थांत नवचैतन्य निर्माण झाले आहे.
गावच्या प्रवेशद्वाराजवळ बाजारपेठेमध्ये भव्य असा अश्वारुढ शिवपुतळा बसविण्यात येणार आहे. सध्या चौथरा बांधकामाचे काम सुरू असून लवकरच पूर्ण होणार आहे. गावात शिवपुतळा बसविण्यात येणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
चौथरा बांधकामाचा शुभारंभ कंग्राळी बुद्रुकचे उद्योजक यल्लोजी तानाजी पाटील व ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी यल्लोजी पाटील यांनी शिवपुतळ्य़ासाठी 25 हजार रुपयांची तर ओमकार प्रशांत जाधव यांनी 51 हजार रुपयांची देणगी दिली. तसेच विक्रम नागेनट्टी यांनी शंभर पोती सिमेंटची देणगी देऊन सहकार्य केले आहे. या कार्यक्रमप्रसंगी भाजप बेळगाव ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव, ग्राम पंचायत सदस्य संजय पाटील, शांतीनाथ चंदगडकर, उदय भागन्नावर, शिवराज जाधव, राजदीप जाधव, श्याम कन्नेकर, विश्वनाथ जाधव, सुजित पाटील, अक्षय कुलकर्णी, विठ्ठल सायन्नावर, अभिषेक जाधव, विक्रम नागेनट्टी, राहुल बेळगावकर, अक्षय निलजकर, लक्ष्मण कुंभार, महेश संभाजी, मनोज जाधव, प्रथमेश कन्नेकर, मोहन हंचीनमणींसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.