सेशेल्समधील स्थिती
वृत्तसंस्था/ व्हिक्टोरिया
लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून जगात सर्वाधिक लस देणाऱया सेशेल्समध्ये अचानकपणे कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली आहे. सेशेल्सच्या या आकडेवारीमुळे जगभरात चिंता वाढली आहे. सेशेल्समधील आकडेवारीची समीक्षा करत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
मागील आठवडय़ात कोरोनाबाधित झालेल्यांपैकी एक तृतीयांश जण पूर्णपणे लसीकरण करविलेले आहेत अशी माहिती सेशेल्सच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सेशेल्समध्ये जगातील अन्य हिस्स्यांच्या तुलनेत लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सर्वाधिक लसीकरण करण्यात आले आहे. कुठल्याही कोरोना लसीला व्यापक समीक्षेशिवाय अयशस्वी ठरविता येणार नसल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
डब्ल्यूएचओ सेशेल्स सरकारच्या थेट संपर्कात आहे. व्यापक समीक्षेदरम्यान विषाणूचे स्ट्रेन आणि प्रकरणांचे गांभीर्य विचारात घेण्याची गरज असल्याचे डब्ल्यूएचओचे पदाधिकारी केट ओ ब्रायन यांनी म्हटले आहे. सेशेल्समध्ये मागील आठवडय़ात देशात सपीय कोरोनाबाधितांची संख्या वाढून 2486 झाली होती.
या 2486 जणांपैकी 37 टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळालेले आहेत. याचबरोबर मालदीवमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. सेशेल्सने आतापर्यंत 57 टक्के लोकांना चीनची साइनोफार्म आणि उर्वरितांना भारतात तयार कोविशील्ड लस दिली आहे.
लस घेणाऱया कुठल्याही व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेला नाही. तर गंभीर प्रकृती होणारे सर्वजण लसीकरण न झालेले आहेत. भारताने सेशेल्सला 50 हजार कोविशिल्डचे डोस दिले होते.