ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव काही थांबायचे नाव घेत नाही आहे. त्यातच आता बॉलिवूड गायक अरिजीत सिंग यांच्या आईचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले आहे. कोलकाताच्या आमरी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून अरिजीतच्या आई आदिती सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 17 मे रोजी त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु त्यांची प्रकृती चिंताजन होती.
दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अरिजीत, मी आणि चित्रपट सृष्टीतील अनेकांना आदिती सिंह यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु गुरुवारी त्यांची प्रकृती अधिक ढासाळली आणि सेरेबल (ब्रेन) स्टोकमुळे रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, श्रीजीत मुखर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच अरिजीतच्या आईला ए निगेटिव्ह रक्ताची आवश्यकता असल्याची पोस्ट सोशल मीडियावर लिहिली होती. त्यानंतर अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी यांनी देखील रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. अरिजीत सिंह यांच्या आईवर मुर्शिदाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.